ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या गणेशाचे घेतले अनेक मान्यवरांनी दर्शन...

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या मुख्य कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या गणरायाचे अनेकांनी दर्शन घेवून आशिर्वाद घेतले.
या ठिकाणी श्रींची मुर्ती सुरेख दर्याचा राजा या स्वरुपात विराजमान करण्यात आली आहे. याचे दर्शन घेण्यासाठी विविध विभागातील पोलीस अधिकारी शिपींग क्षेत्रातील उद्योजक, राजकीय नेते, समाजसेवक, कामगार नेते, पत्रकार आणि मित्र परिवार उपस्थित राहून दर्शन घेतले आहे. यावेळी येणार्‍या प्रत्येकास युनियनच्या वतीने शाल व श्रींची मुर्तीची देवून विशेष सन्मानित करण्यात आले. 

Comments