कळंबोली वसाहत परिसरातील बंद पथदिवे सुरू करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि. ९ (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीमधील काही ठिकाणी मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या काही दिवसापासून बंद असून आगामी सणासुदीच्या काळात ते बंद पथदिवे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी शिवसेनेत केली आहे.
जिल्हा प्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या आदेशाने आणि विधानसभा समनव्यक प्रदीप ठाकूर व शहर प्रमुख डी.एन.मिश्रा व उपमहानगर समन्वयन आत्माराम गावंड यांच्या मार्गदर्शनाने कळंबोली शहराच्या प्रवेशद्वारापासून म्हणजेच शिवसेना शाखा ते कामोठा बस स्टॉप,जाधव वाडी येथील सर्विस रोडवर कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा नाही, त्यामुळे संध्याकाळनंतर सदरील रोडवर मोठ्या प्रमाणात अंधार पसरतो त्यामुळे तेथून नोकरीवरून संध्याकाळी येणार्‍या महिला वर्गांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते व वळसा मारून कळंबोली वसाहतींमध्ये यावे लागते. तसेच सदरील सर्विस रोडवर अंधार असल्यामुळे एखाद्या गुन्हा घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. या संदर्भात आज रायगड भवन, बेलापूर येथील कार्यकारी अभियंता कांबळे यांना निवेदन दिले व सदरील प्रकरणात लक्ष घालून वरील सर्विस रोड वर त्वरित स्ट्रीट लाइट चालू करावेत जेणेकरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी मागणी केली. 
यावेळी शहर समन्वयक  गिरीश धुमाळ, अक्षय साळुंखे शहर संघटक, नारायण फडतरे उपशहर प्रमुख, सुर्यकांत म्हसकर उप शहर प्रमुख, आकाश शेलार विभाग प्रमुख, नागेश शेळके शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख अनिकेत कन्हेरे उपस्थित होते. या मागणीची दखल घेवून लवकरच पथदिवे सुरू करतो असे आश्‍वासन देण्यात आले आहे.

Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image