"सावरे" या लोकगीताची कौशल विनायक गायकवाड यांची पाश्चात्य पुनर्रचना

पनवेल / वार्ताहर :- शिवनगर, मोहोपाडा, ( रायगड -महाराष्ट्र )  येथे कौशल व्ही.जी. या संगीत दिग्दर्शकाने तयार केलेल्या 'सावरे' गाण्याला त्याच्या प्रेक्षकांकडून आधीच खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. 3 सप्टेंबर, 2021 रोजी हे गाणे रिलीज झाले. प्रणव-गणेश या संगीत निर्मात्याच जोडी सह कौशलने आजच्या युगाच्या संगीताच्या आवाजांचा वापरकरून 'सावरे' म्हणून ओळखले जाणारे 'जमुना किनारे मेरो गाव' हे पारंपरिक लोकगीत पुन्हा तयार केले आहे.

या अगोदर 'सावरे' ह्या गीताची ऑस्कर विजेते, संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान यांनी 1997 मध्ये 'यशवंत' चित्रपटासाठी पारंपरिक पुनर्रचना केली होती. कौशलची ही 'सावरे' ची आवृत्ती वंशीता सैनी (पाश्चात्य गायिका) व गौरी पठारे (शास्त्रीय गायिका) यांनी गायली आहे, त्यात कौशल ने नवीन लिहिलेले गीत आणि नव्याने  केलेली रचना या गाण्याला एक नवी रूप देत आहेत, गाण्याची व्यवस्था या गाण्याला फ्यूचर हाऊस गाणे बनवते परंतु त्यात तबल्याचा वापर सुद्धा झाला आहे. या सर्व घटकांना मुळे गाण्याला मध्ये दोन भिन्न युगांचे संगीत एकत्र येते.

गाणे ऐकण्यासाठी www.kaushalvg.com/saaware ला भेट द्या,
किंवा YouTube वर
https://saaware.page.link/YouTube

Spotify, Amazon, YouTube, Apple Music, Prime Music, Jio Savan इत्यादी सारख्या जगभरातील सर्व संगीत ऐकण्याच्या अनुप्रयोगावर कौशलचे हे गाणे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Comments