नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर


 पनवेल वैभव वृत्तसेवा :  -  गणेशोत्सवानंतर रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अलिबाग, पनवेल , (ग्रामीण), पेण आणि कर्जत या तालुक्यांमधील पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या काही प्रमाणात वाढीस लागल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.
      
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी जनतेला आवाहन केले आहे की, नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता शासनाने कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जास्त गर्दी करू नये, मास्क वापरावा, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, ताप, खोकला, तीव्र डोकेदुखी, अंगदुखीसदृश्य कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, कोविड चाचणी करून घ्यावी, त्याचप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणही करून घ्यावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा जनतेची काळजी करण्यासाठी पूर्णपणे सज्ज व सतर्क असल्याचे त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.
Comments