केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करण्याची शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामी कारक वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण केल्याचे विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी बदनामीकारक वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष भावना निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे. तरी सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं.30/221 भादवी कलम 500, 505 (2), 153 ब (1) (क) गुन्हे अंतर्गत तपास करावा. सदर गुन्ह्यातील भारत सरकारचे मंत्री असून त्यांनी राज्याचेे मुख्यमंत्री यांच्या विरोधात विधान केलेले आहे. सदर गुन्ह्याची गंभीरता व व्यापकता लक्षात घेवून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी केली आहे.

फोटो ः बबनदादा पाटील
Comments