नोकिया कंपनीने तयार केलेल्या एबीआयए व एएसआयए कार्डची चोरी.....
नोकिया कंपनीने तयार केलेल्या एबीआयए व एएसआयए कार्डची चोरी...

पनवेल, दि.७  (संजय कदम) ः तालुक्यातील पालेखुर्द येथे स्कुटीवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी नोकीया कंपनीने तयार केलेल्या एबीआयए व एएसआयए कार्ड ज्याची किंमत जवळपास 78 हजार रुपये इतकी आहे. याची चोरी झाली आहे.
जनार्दन बाबर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पहाटेच्या सुमारास पालेखुर्द येथे स्कुटीवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी सचिन दुर्गे यांच्या जागेतील कंपनीच्या मालकीच्या इंडस टॉवर यंत्रणेवरील एअरटेल कंपनीचे व नोकीया कंपनीने तयार केलेले एबीआयए व एएसआयए कार्ड या दोन कार्डची चोरी केल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments