विमानतळावरील कामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी देण्याच्या मागणीला सिडकोकडून सकारात्मक प्रतिसाद
पनवेल दि.03 (संजय कदम) ः विमानतळावर होत असलेल्या कामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी अशी मागणी सिडकोचे संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार व दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील ह्यांनी केली होती. या मागणीला सिडकोने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या 7 ते 8 दिवसात या संदर्भात बैठक घेवून योग्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात नियोजन करू असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.
सिडकोचे संचालक डॉ. संजय मुखर्जी ह्यांची भेट घेऊन येणार्‍या विमानतळावर होत असलेल्या कामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच सदर ठिकाणी होत असलेल्या विमानतळावर विविध प्रकारच्या नोकर्‍या निर्माण होणार असून प्रकल्पग्रस्त तरुणांना त्यासाठी लागणारी कार्यकुशलता शिकता यावी म्हणून अद्ययावत प्रशिक्षण केंद्र येथे उभारावे अशी विनंती केली. तसेच इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध असणे प्रचंड गरजेचे असून त्यासाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध होणे मह्त्वाचे आहे. इथला स्थानिक भूमिपुत्र कार्यकुशल झाल्यास तो इथे भविष्यात निर्माण होणार्‍या असलेल्या रोजगारांसाठी तयार होईल असेही जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी सांगितले होते. या संदर्भात येत्या 7 ते 8 दिवसात सर्वांची एकत्रित बैठक घेवून योग्य प्रशिक्षण स्थानिक भूमीपुत्रांना व तरुणांना कशा प्रकारे देता येईल व या ठिकाणी आवश्यक असलेले उद्योग धंदे याची माहिती स्थानिक लोकांना देवून त्यांना सुद्धा प्रशिक्षित करण्यासंदर्भात योग्य नियोजन करून असे आश्‍वासन सिडकोचे संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या बैठकीत दिले आहे.
फोटो ः बबन पाटील
Comments