भाजपा नेते बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध समजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा...
पनवेल :- कोकण म्हाडा मा.सभापती तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील हे नेहमीच आपला वाढदिवस समाज हेच आपल कुटुंब असे मानून विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करत असतात म्हणूनच गोरगरीब जनतेला आपलासा वाटणारा आणि नागरिकांसाठी प्रामाणिकपणे अहोरात्र झटणारा नेता म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे.
सध्या कोरोना काळात एकूणच अनेकांची बिघडलेली आर्थिक घडी लक्षात घेता त्यांचा हा वाढदिवस बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू कलाकार,रिक्षा चालक यांना मदत करून साजरा करण्यात आला.या वेळी गरजू रिक्षा चालकांना मोफत CNG कूपन चे वाटप केले गेले तसेच रंगभूमीच्या गरजू कलाकार बांधवांना मोफत धान्य किट दिले गेले.याच कार्यक्रमांतर्गत कोरोना संकट काळात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट, टेक्निशियन व काही होतकरू तरुणांचा कोविड योद्धा म्हणून विशेष सन्मान आणि सत्कार करण्यात आला.

हा मदत उपक्रम मा. उपमहापौर तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ साकारण्यात आला.
या उपक्रमाचे सर्वच उपस्थितांनी आणि लाभार्थ्यांनी कौतुक केले व आभार केले.अनेकांनी श्री बाळासाहेब पाटील यांच्या सोबतचे जुने आठवणीतील किस्से सांगितले आणि बाळासाहेबांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.
यावेळी मा.उपमहापौर तसेच भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील,भाजपा युवा मोर्चाचे मा.सरचिटणीस समीर कदम, भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम,देविदास खेडकर,उदय पाटील,भिमराव गेंड,प्रशांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments