छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत राज्य समन्वयक शिष्ट मंडळ व शेकडो मराठे कोपर्डी येथे जाणार...

पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः छत्रपती संभाजीराजे कोपर्डी येथे जाणार आहेत तसेच काकासाहेब शिंदे यांच्या घरी सुद्धा भेट देण्यासाठी जाणार आहेत. राजे12 जूनला पुणे येथून निघणार आहेत व राजें सोबत रायगड मधून समन्वयक जाणार असल्याची माहिती विनोद साबळे यांनी दिली. 
या संदर्भात दांडफाटा, रसायनी या ठिकाणी मिटिंगला राज्य समन्वयक विनोद साबळे , गणेश कडू , सुनील पाटील , राजेश लाड , राजू गायकवाड , अमोल जाधव , कमलाकर लबडे , यतीन देशमुख , राजू भगत , शशिकांत मोरे , अमित यादव , अनंत चव्हाण , नितीन दगडे आदींची नियोजना संदर्भात बैठक झाली व शेकडो मराठे रायगड मधून राजें सोबत कोपर्डीला जाणार असे ठरवण्यात आले.

फोटो ः बैठकीला मार्गदर्शन करताना विनोद साबळे
Comments