ओव्हरहेड क्रेनमधून लोखंडी स्लीड कॉईल पडून कामगाराचा मृत्यू ; क्रेन ऑपरेटर व सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल..


पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः तळोजा एमआयडीसीतील तळोजा स्टील सर्व्हीस सेंटर कंपनीमध्ये ओव्हरहेड क्रेनमधुन लोखंडी स्लीड कॉईल खाली उभ्या असलेल्या कामगाराच्या अंगावर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर कंपनीतील ओव्हरहेड क्रेनवरील ऑपरेटर व सुपरवायझर या दोघांनी काम सुरु असताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी सदर घटनेला या दोघांना जबाबदार धरुन त्यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  
तळोजा एमआयडीसीतील तळोजा स्टील सर्व्हीस सेंटर या कंपनीमध्ये लोखंडी कॉईल पँकिंग करण्याचे काम सुरु होते. त्यासाठी ओव्हरहेड क्रेनमधुन लोखंडी स्लीड कॉईल एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत होते. मात्र यावेळी अचानक ओव्हरहेड क्रेन नादुरुस्त होऊन त्याच्यामधुन लोखंडी स्लीड  कॉईल निसटून ते खाली उभ्या असलेल्या इमादुल इशाउद्दीन गाझी (45) या कामगाराच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत इमादुल गाझी याचा मृत्यू झाल्याने तळोजा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन या घटनेचा तपास सुरु केला होता.  
या तपासात कंपनीतील ओव्हरहेड क्रेनचा ऑपरेटर सिनीयर फिटर सुनिल सिंग याने ओव्हरहेड क्रेन ऑपरेट करत असताना क्रेनच्याजवळ कुणी व्यक्ती येऊ नये याची तसेच क्रेन ऑपरेट करीत असताना, लक्ष ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सदर ठिकाणी थांबविले आवश्यकत होते. तसेच सदर कामाचे सुपरवायझर टुटुळ गाजी याने देखील काम सुरु असताना, आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक होते. परंतु या दोघांनी क्रेनचे काम सुरु असताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे तपासात आढळुन आले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी स्वत: या प्रकरणात फिर्यादी होऊन ओव्हरहेड क्रेनवरील ऑपरेटर सुनिल सिंग व सुपरवायझर टुटुळ गाजी या दोघांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image