कळंबोली वसाहतीतील मान्सून पूर्व कामे तातडीने करून घेण्याची नगरसेवक रविंद्र भगत यांची मागणी....
पनवेल दि.27 (संजय कदम):कळंबोली वसाहतीतील मान्सून पूर्व कामे तातडीने सिडको प्रशासनाने करून घ्यावीत अशी मागणी स्थानिक नगरसेवकरविंद्र भगत यांनी सिडको विभागीय कार्यालय कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.         या निवेदनातनगरसेवकरविंद्र भगत यांनी म्हटले आहे की, मान्सून पूर्व कामे करणे प्रभाग क्र-10 व प्रभाग क्र.-7, 8, 9 मान्सून पूर्वी गटारे साफसफाई करणे, धोकादायक वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात यावी. तसेच पावसाळ्यात नाले तुडूंब भरले जातात त्यामुळे तेथील राहणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तरीतातडीने सिडको प्रशासनाने हि सर्व कामे पूर्ण करून द्यावी अशी मागणी केली आहे.       
Comments