दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेच्या मागणीला शासनाकडून मंजूरी.....

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः दि बा पाटील प्रकल्प ग्रस्त ठेकेदार संघटनेच्या मागणीला आज मोठे यश मिळाले असून महाराष्ट्र शासनातर्फे ते करीत असलेल्या 10 लाख रुपयाच्या कामाला मंजूरी देण्यात आले आहे व तशा आदेशाचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
सदर संघटना 2012 पर्यंत एटू हे 5 लाखाचे होते. परंतु 2012 नंतर हे एटू 3 लाखाचे करण्यात आले. त्यामुळे ठेकेदारचे खूप हाल झाले होते. ही कामे ठेकेदारांना परवडत नव्हती. त्यासाठी ही कामे तीन लाखा वरून दहा लाखाची करावी अशी मागणी दि बा पाटील ठेकेदार संघटने मार्फत शासनाकडे करण्यात आली होती. संघटनेचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे, कार्याध्यक्ष त्रिंबक केणी, सल्लागार रविशेठ पाटील, चिटणीस राजेश गायकर, उपाध्यक्ष मोहन पाटील, मारुती पाटील, मोहन म्हात्रे, प्रमोद भगत, जीवन गायकवाड इत्यादींनी शासनाकडे पत्रव्यवहार करून यामागणी बाबात पाठपुरावा केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नाना पटोळे आदींनी त्यांच्या मागणीचा विचार करून एटू तीन लाख वरून दहा लाख करण्याची परवानगी दिल्याने या ठेकेदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Comments