लायन्स क्लब पनवेल व पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर संपन्न....
पनवेल, दि.25  (संजय कदम) ः लायन्स क्लब पनवेल व पुज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सिंधी पंचायत हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून चांगला प्रतिसाद दिला.
सध्या सर्व ठिकाणी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पनवेल लायन्स क्लबच्या अध्यक्षा भावना जेसवानी व पुज्य सिंधी पंचायत समितीचे अ‍ॅड.मनोहर सचदेव यांनी सांगितले. याप्रसंगी अध्यक्ष ला.भावना जेसवानी, सचिव ज्योती देशमाने, रिजन चेअरमन संजय गोडसे, संजय पोतदार, अशोक गिल्डा, राजेंद्र जेसवानी, नंदकिशोर धोत्रे, गौतम म्हस्के, सुरेश घाडगे, मुर्तुझा अफसर, शोभा गिल्डा, मिना पोतदार, स्वाती गोडसे, सुयोग पेंडसे, सुरभी पेंडसे, राजकुमार सचदेव, दौलत सचदेव आदी सभासद उपस्थित होते.

फोटो ः रक्तदान शिबीर
Comments