बच्चन फॅमिली सोबत स्क्रीनवर पहिल्यांदाच दिसणार मराठमोळी पूजा सावंत...

कल्याण ज्वेलर्सच्या #TrustIsEverything जाहिराती मध्ये पूजा दिसणार बच्चन फॅमिली सोबत

मुंबई, १० फेब्रुवारी २०२१:- कल्याण ज्वेलर्सच्या ट्रस्ट सिरीज ऍड फिल्म्सची परंपरा कायम राखत या ब्रॅंडने #TrustIsEverything या अभियानाच्या सहाव्या आवृत्तीचा शुभारंभ एका डिजिटल फिल्मने केला आहे. या फिल्ममध्ये ब्रँड अम्बॅसॅडर्स अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा स्क्रीनवर पहिल्यांदा एकत्र येत आहेत.  कल्याण ज्वेलर्सच्या या फिल्मच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट पहिल्यांदा घडत आहे, बच्चन परिवारासोबत मराठी अभिनेत्री आणि कल्याणची महाराष्ट्रासाठी क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर पूजा सावंत देखील यामध्ये दिसणार आहे. सर्व भारतीय लग्नांचा अविभाज्य भाग असलेल्या - ब्रँडच्या मुहूरत ब्रायडल कलेक्शनची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना कल्याण ज्वेलर्सच्या ट्रस्ट सिरीजमध्ये लग्नसोहळ्याच्या कथेमार्फत विश्वास या भावनेचे महत्त्व दर्शवले गेले आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी कल्याण ज्वेलर्सची क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर पूजा सावंत हिने या प्रोजेक्टवर काम करतानाच्या आपल्या अनुभवाबद्दल सांगितले, "कल्याण ज्वेलर्सच्या #TrustIsEverything अभियानासाठी महान अभिनेते अमिताभ जी व जया बच्चन जी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार यासाठी मी खूप उत्सुक होते. एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणे आणि इतक्या महान अभिनेत्यांसोबत काम करणे हा अविस्मरणीय अनुभव ठरला.  या ऍड फिल्मला इतकी प्रशंसा मिळते आहे याचा मला खूप आनंद होतोय.  याच्या मराठी व्हर्जनसाठी मी अतिशय उत्सुक आहे कारण यामध्ये मी मुख्य व्हॉइस ओव्हर केले आहे."

जाहिरात सुरु होते तेव्हा नऊवारी साडी परिधान केलेली पूजा सावंत आपल्याला दिसते.  त्यासोबत नथ, राणी हार, चोकर सेट, ठुशी, बांगड्या असा महाराष्ट्रीयन लग्नातील दागिन्यांचा खास साज देखील तिने चढवलेला आहे.  मराठी वधूच्या भूमिकेतील पूजा सावंत मंडपाच्या दिशेने पावले टाकत आहे, यावेळी जया बच्चन 'भरोसा रखो' या अभियानाचे खरे सार समजावून सांगत आहेत, कोणतेही नाते निर्माण होत असताना आणि ते निभावत असताना विश्वास किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करत आहेत. नवऱ्यामुलाच्या कुटुंबाच्या भूमिकेतील बच्चन परिवारासोबत या जाहिरातीमध्ये पारंपरिक पद्धतीचा 'गृह प्रवेश' पाहायला मिळतो.  प्रख्यात तारे-तारकांचा सहभाग असलेल्या या जाहिरातीमध्ये बच्चन परिवारासोबत पूजा सावंत विविध प्रसंगांमधून नववधूचा प्रवास अतिशय सुरेख पद्धतीने दाखवते.

या जाहिरातीमध्ये कल्याण ज्वेलर्सचे सर्व जागतिक आणि क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर्स सहभागी झाले आहेत. आपल्या विविध ओळखी, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांना विश्वास या भावनेच्या धाग्यांनी एकत्र गुंफत हे सर्व एकत्र आले आहेत.  कल्याणचे राष्ट्रीय ब्रँड अम्बॅसॅडर श्री अमिताभ बच्चन यांनी या फिल्मचे  सोशल मीडियावर डिजिटल उद्घाटन केले. 

जाहिरात पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा: https://youtu.be/OQUc6kxlJHA
Comments